निराधार अनुदान योजना हे कागदपत्रे सादर करा अन्यथा अनुदान मिळणार नाही niradhar yojana





  niradhar yojana शासनाच्या विविध निराधार योजनेतील सात हजार लाभार्थीना विविध कागदपत्रे सादर करावी लागणार आहे आतापर्यंत ४ हजार ५४० लाभार्थींनी कागदपत्रे सादर केली आहे.




उर्वरित लाभार्थींनी वेळेच्या आता कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे अनुदान बंद केले जाणार आहे त्यामुळे लाभार्थींनी वेळेत आपले कागदपत्रे सादर करावी.




केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार घटकासाठी विविध योजना राबवल्या जातात. अशा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना आर्थिक स्वरुपात मासिक लाभ दिला जातो.




यात राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना तर केंद्र शासनाच्या वतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजना राबविल्या जातात.





या सर्व योजनांतर्गत पात्र लाभार्थीना दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्यात येते हे अनुदान निराधार समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना दिले जाते. niradhar yojana





परंतु गैरप्रकार टाळण्यासाठी अनुदान सुरु झालेल्या पात्र लाभार्थीची पडताळणी करणे आवश्यक आहे.





हे कागदपत्रे करावी लागणार सादर

तहसील प्रशासनाने जानेवारी या लाभार्थ्यांना अपडेट आधार कार्ड, बँक पासबुक, हयात असल्याचे प्रमाणपत्र हे कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले होते.





दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, विधवा असल्यास पुनर्विवाह न केल्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.




अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Post a Comment

और नया पुराने