शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन 100 टक्के अनुदानावर मिळणार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख.

 




Jilha Parishad Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्युज पेपर वरती जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाकडून ज्या योजना सुरू करण्यात आलेले आहेत. या योजनेबद्दल माहिती देणार आहोत आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन वर शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.



  यासाठी कुठे आणि कशाप्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो महिलांसाठी उपयुक्त अशी घरगुती शिलाई मशीन आणि लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक अशी झेरॉक्स मशीन या दोन्ही उपकरणांसाठी समाज कल्याण विभागामार्फत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे 




आणि या लेखाच्या माध्यमातून आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो या योजनेची सविस्तर जाहिरात आणि अधिकृत बातमी तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

 



अधिकृत बातमी ✍️ इथे क्लिक करा 




जालना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये त्याचाच एक भाग म्हणून याच लाभार्थ्यांना अगदी मोफत शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन वाटप केली जात आहे. 




झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन वाटप करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2024 देण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये विहित नमुन्यात लाभार्थ्यांनी त्यांचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थी यांची आर्थिक दृष्ट्या सामाजिक स्थिती पाहता त्यांना समाजामध्ये मनाचे स्थान मिळालाच हवे आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हायलाच हवी या सर्व उद्दिष्ट मुळे शासनाकडून या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.


 

 



यामुळेच जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाकडून शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन मोफत मिळत आहे. याद्वारे या व्यक्ती त्यांचा व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे करू शकतात. तर मित्रांनो अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे आता आपण जाणून घेऊया.

 




ही आहेत अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे.

1) जातीचा दाखला

2) दिव्यांग सर्टिफिकेट

3) आधार कार्ड

4) पॅन कार्ड

5) ग्रामपंचायत रहिवासी दाखला

6) ग्रामसभा ठराव

 


या योजनेसाठी काय असेल पात्रता.?

जिल्हा परिषद समाजकारण विभाग अंतर्गत राबविण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन अनुदानासाठी योग्य पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

1) फक्त मागासवर्गीय आणि दिव्यांग व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

2) खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना नसून फक्त मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.





3) यामध्ये अर्जदारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.

4) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असावी.

5) अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

 



अर्ज कसा करावा.?

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभागामध्ये त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे. तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असणार आहे.




 या कालावधीमध्ये दिलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल त्यानंतर जे अर्ज येतील ते बाद ठरवण्यात येतील. तर मित्रांनो या योजनेविषयी सविस्तर अधिकृत बातमी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुढील माहिती पाहू शकता.

 


अधिकृत बातमी ✍️ इथे क्लिक करा

Post a Comment

और नया पुराने