शासनाकडून तुम्हाला मिळेल का ई राशन कार्ड ? काय होणार फायदा ? वाचा डिटेल्स पटकन ! E Ration Card Maharashtra




  E Ration Card Maharashtra शासनाकडून नागरिकांना आता मिळणार ई- शिधापत्रिका रेशन कार्ड आता ना फाटण्याची झंझट, ना सोबत वागविण्याचा त्रास रेशन कार्डची छपाई शासनाने बंद केली


असून आता नवीन प्रणाली नुसार ई- रेशनकार्ड (ऑनलाइन) लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करण्याची प्रक्रियाही आता ई रेशनकार्डद्वारे करण्यात येणार



आल्याची माहिती पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी दिली. शासनाकडून अंत्योदय, अन्न सुरक्षा व शेतकरी अशा तीन वेगवेगळ्या योजनेतून लाभार्थ्यांना धान्य देण्यात येते.


E Ration Card Maharashtra

यासाठी पिवळी, केसरी अशा वेगवेगळ्या रंगाचे रेशनकार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. शासनाकडून मागणीनुसार लाभार्थ्यांना रेशन कार्डचा पुरवठा केला जात होता.



 

परंतु आता सर्वच शासकीय कामे ऑनलाइन झाली असल्याने शासनाने रेशनकार्डची छपाई बंद करून ई- रेशनकार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे आता नवीन रेशनकार्ड मिळणार नसून त्या ऐवजी ई- रेशनकार्ड मिळणार आहे. यासाठी संबधित लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांनानिःशुल्क ई रेशनकार्ड मिळणार आहे.


शिवाय शिधा पत्रिकेत सुधारणा करणे, नावे वाढविणे किंवा कमी करणे ही सर्वच कामेही ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार आहेत.


ज्या कुटुंबाला रेशन कार्डवरील नावे वगळायची असतील किंवा वाढवायची असतील त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. तसेच ऑनलाइन ई- रेशनकार्डघ्यावे, असे आवाहन नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी


 

केले आहे.दरम्यान, ऑनलाइन ई शिधापत्रिका वितरित करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सिल्लोड येथील पुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्या नुसार नियोजन सुरू आहे.

Post a Comment

और नया पुराने