पिंपरी चिंचवड | महानगरपालिका अंतर्गत पहिल्या टप्प्यात 150 फायरमनची सरळसेवेने भरती (PCMC Fire Brigade Bharti 2024) केली जाणार आहे. यासोबतच 10 सह अधिकारी, 06 स्थानक अधिकरी, 15 यंत्रचालक, 10 लिडिंग फायरमन अशी एकूण 191 पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे नियोजन आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार लेल्या आकृतीबंधानुसार 191 पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचन, फायरमन ही 150 रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहेत.
PCMC Fire Brigade Bharti 2024
लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आगताना मोठ्या अडचणी येतात, यासाठी अग्निशमन विभागात ही भरती करण्यात येणार आहे.
शहराच्या लोकसंख्येनुसार शहरागध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्टयांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये 18 अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे.
मात्र, लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता 06 लिडिंग फायरमन तर 30 फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह 10 केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.
PDF जाहिरात – PCMC Fire Brigade Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
एक टिप्पणी भेजें