बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये मिळणार जणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशा नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
अजूनही बरेच बांधकाम कामगार असे आहेत कि त्यांनी त्यांची बांधकाम कामगार नोंदणी न केल्याने ते अशा योजनांपासून वंचित झाले आहे.
बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजनांची आपण एक एक करत माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
बांधकाम कामगार कुटुंब नियोजन योजना अंतर्गत मिळतात 1 लाख रुपये
यामधील एक योजना म्हणजे कुटुंब नियोजन हि योजना होय. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे वयाच्या १८ वर्षापर्यंत मुदत बंद ठेव म्हणून 1 लाख रुपये दिले जाते.
यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगारास सक्षम वैदकीय अधिकाऱ्याने दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
अर्जदारास एकच कन्या असेल अपत्य असेल तर त्या संबधित शपथपत्र असणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगार जे पण कागदपत्रे सादर करणार आहे त्यावर त्यांच्या स्वताच्या स्वाक्षऱ्या असणे गरजेचे आहे म्हणजेच हि सर्व कागदपत्रे साक्षांकित करणे गरजेचे आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलीचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
हि सर्व कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून ठेवावीत.
आचार साहिंता असल्याने वेबसाईट बंद आहे पण काही काळात लगेच सुरु होईल वेबसाईट
सध्या आचार साहिंता सुरु असल्याने नवीन क्लेम करणे बंद आहे परंतु हि प्रक्रिया निवडणूक संपली कि लगेच सुरु होणार असल्याने या संदर्भात तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. ज्या बांधकाम कामगार बांधवानी त्यांची नोंदणी केली असेल त्यांच्याकडे बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक असतो. हा नोंदणी क्रमांक आणि मोबाईलवर आलेला otp टाकून लॉगीन करावे लागते आणि मग तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
जेंव्हा अर्ज सुरु होईल त्या वेळी तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या जेणे करून तुम्हाला देखील 1 लाख रुपये मिळू शकतील.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये किंवा युट्युबमध्ये digital dg bandhkam kamgar yojana असा कीवर्ड टाकून सर्च करा जेणे करून तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल.
अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये मिळणार असून यासाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी अर्ज सुरु झाल्यावर अर्ज करून द्यावेत.
एक टिप्पणी भेजें