लाडकी बहीणचा पुढील हफ्त्याची तारीख जाहीर, डिसेंबर पेमेंटचा नवीन अपडेट जाहीर!

 




लाडक्या बहिणींना आता वर्षाला ओवाळणी नाही तर माहेरचा आहेर दर महिन्याला मिळणार आहे. विरोधी पक्षाचे लोक लाडकी बहीण योजना बंद करायला न्यायालयातही गेले होते. पण आम्ही देणारे सरकार आहोत. आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही असा विरोधकांचा कयास होता. पण आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता निवडणूक झाल्या-झाल्या लगेच डिसेंबरचे पैसेही खात्यात येतील (Ladki Bahin December Payment Date) , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने सुरू केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास मदत करणे आहे. या योजनेंतर्गत, बहिणींच्या शिक्षणासह त्यांच्या संपूर्ण विकासासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. विशेषतः, या योजनेचा लाभ अविवाहित, शिक्षित आणि गरीब कुटुंबातील मुलींना मिळतो.


 


 


मुंबईला झोपडपटटीमुक्त शहर करणार असून प्रत्येक झोपडपटटीवासियाला मालकीचे घर देणार असल्याचेही ते म्हणाले. कुर्ला विधानसभा मतदारसंघातील शिंदसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खटाखट पैसे देणार सांगून मते घेतली. पण निकालानंतर आता म्हणत आहेत, मोदी सरकारकडे मागा, Mumbai Main राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असे म्हणाले होते, पण केले नाही. हिमाचलमध्येही राहुल गांधी यांनी फसविल्याची टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बहीण आमची लाडकी आहेच पण तिला सुरक्षितही करायची आहे. केवळ दीड हजार देऊन आम्ही थांबणार नाही ही रक्कम पुढे वाढवू, पंतप्रधान मोदींच्या योजनेनुसार लखपती दीदीही तयार करायच्या आहेत. युवकांनाही आठ हजारांचा स्टायपेंड आम्ही देत आहोत. त्यांना पुढे कायम रोजगारही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ठराविक वेळेनुसार आर्थिक सहाय्य मिळते. यंदा लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यांचे वितरण कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तथापि, या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक हफ्ता महिन्याच्या सुरुवातीस किंवा मध्यभागी मिळतो, ज्यामुळे महिलांना त्यांचे आर्थिक नियोजन करण्यास मदत होते.


 


 

लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात पैसे आले नाही? ‘इथे’ नोंदवा आपली तक्रार, अर्ज होईल फटाफट…

 



राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा सन्माननिधी देण्यात आला. जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे पैसे आतापर्यंत देण्यात आले आहेत. या योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. तर, आता निवडणुका लागल्याने या योजनेसाठी असलेला निधी थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही? अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वासित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही.”


 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच कोटी महिलांचे अर्ज आले होते, त्यातील २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेत. तर २ लाख २० हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. तर, आता निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना कायमस्वरुपी सुरू राहणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. तसंच, महाविकास आघाडीने या योजनेतील रक्कम वाढवणार असल्याचं सांगितलं.


केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर दि. १९ ऑक्टोबर रोजी ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले. अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असे म्हटले जाते. नवीन सरकार या योजनेबाबत कुठलाही निर्णय घेईपर्यंत ही योजना सुरुच राहील. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच पुढील किमान दीड महिना हप्त्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

Post a Comment

और नया पुराने