Bank Of Maharashtra Farm House Loan: तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला तुमच्या शेतावर फार्म हाऊस बांधण्याची इच्छा असेल परंतु आर्थिक अडचणीमुळे तुम्हाला फार्म हाऊस बांधता येत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर फार्म हाऊस बांधण्यासाठी कृषी टर्म लोन देत आहे. या योजनेअंतर्ग तुम्ही मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून फार्म हाऊस बांधू शकणार आहात आणि त्याचा तुमच्या शेतीसाठी वापर करु शकणार आहात. चला तर मग याबाबत अधिक माहिती मिळवूया!
कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्राकडून फार्म हाऊस बांधण्यासाठी कृषी टर्म लोन योजनेसाठी अर्ज करताना आर्जदाराची पात्रता देखील तपासण्यात येणार आहेत. बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार,
अर्जदाराकडे किमान अडीच एकर जमीन असणे आवश्यक आहे.
एक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट या योजनेअंतर्गत कर्ज मिळवू शकतील.
अर्जदार शेतकऱ्याचे वय किमान 18 ते कमाल 65 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेअंतर्गत कर्ज करु शकतील.
म्हणजेच 18 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास अपात्र ठरणार आहेत.
कर्जाची रक्कम किती असेल?
2 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज – ज्या शेतकऱ्यांची जमीन 2.5 एकर एवढी जमीन सिंचनाखाली आललले त्यांना 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत कृषी टर्म लोन या बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कर्ज मिळविता येईल.
10 ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज – ज्या शेतकऱ्यांची 5 एकर पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त जमीन सिचना खाली किंवा उत्पन्नदेय आहे अशांना 10 ते 50 लाखापर्यंतचे कर्ज मिळवता येईल. Bank Of Maharashtra Farm House Loa
कर्जाचा व्याजदर किती असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीच्या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यासाठी देत असलेल्या कृषी टर्म योजनेअतंर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेवर व्याज किती असेल असा अनेकांना प्रश्न पडतो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेत स्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, शेतीविषयक कर्जासाठी बँक जेवढे व्याजदर आकारते तेवढेच व्याजदर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त प्रक्रिया शुल्क देखील आकारण्यात येणार नसल्याचे बँकेच्या नोटिफिकेशन्स मध्ये लिहिण्यात आले आहे. Bank Of Maharashtra Farm House Loan
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा जाणून घ्या!
शेतीत फार्म हाऊस बांधण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळवायचे असल्यास तुम्ही तुमच्या परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या तुमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन तुम्ही याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता. बँकेच्या शाखेतच तुम्हाला या कर्जासाठी लागणारा अर्ज मिळेल.
https://bankofmaharashtra.in/mar/farmhouse-agriculturists-scheme या लिंकवर तुम्हाला योजनेसंबंधीत सर्व माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा या बटणावर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. Bank Of Maharashtra Farm House Loa
एक टिप्पणी भेजें