मुंबई | TCS Recruitment: भारतातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नवीन नोकर भरती (TCS Recruitment 2024) सुरू केली आहे.
ज्यामुळे विविध शाखेतील पदवीधरांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील. बाजारात आयटी कंपन्यांच्या मागणीत घट झाली होती त्यामुळे भरती थांबवण्यात आली होती.
पदवीधर विद्यार्थ्यांना संधी – TCS Recruitment 2024
TCS ने 2024 च्या B.Tech, BE, MCA, MSc आणि MS पास झालेल्या तसेच आर्ट्स कॉमर्स पदवीधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.
कंपनीच्या वेबसाइटनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे आणि परीक्षा 26 एप्रिलला होणार आहे. या वेबसाईटवर अर्ज करु शकता- https://www.tcs.com/careers/india/tcs-bps-fresher-hiring-2024
इतका मिळेल पगार
TCS तीन श्रेणींसाठी भरती करत आहे. ज्यामध्ये निन्जा, डिजिटल आणि प्राइम नावाच्या श्रेणी आहेत. निन्जा श्रेणीमध्ये निवडलेल्या व्यक्तींना दरवर्षी 3.36 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.
TCSच्या डिजिटल श्रेणीमध्ये वार्षिक 7 लाख रुपये आणि प्राइम श्रेणीमध्ये वार्षिक 9-11.5 लाख रुपये देऊ केले आहेत.
कंपनीच्या व्यवस्थापनाने जानेवारीमध्ये जाहीर केले होते की ते 2024-25 या आर्थिक वर्षासाठी फ्रेशर्सची भरती करण्याची प्रक्रिया सुरू करत आहेत. कंपनी आता भरतीसाठी संस्थांशी संपर्क साधत आहे.
TCS चे मुख्य एचआर अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितले होते, ‘आम्ही पुढील वर्षासाठी आमची कॅम्पस हायरिंग सुरू केली आहे आणि फ्रेशर्स टीसीएसमध्ये सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.’
एक टिप्पणी भेजें