TCS Recruitment: भारतातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नवीन नोकर भरती सुरू केली आहे, ज्यामुळे अभियांत्रिकी पदवीधरांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील. बाजारात आयटी कंपन्यांच्या मागणीत घट झाली होती त्यामुळे भरती थांबवण्यात आली होती.
पदवीधर विद्यार्थ्यांना संधी
TCS ने 2024 च्या B.Tech, BE, MCA, MSc आणि MS पास झालेल्या तसेच आर्ट्स कॉमर्स पदवीधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे आणि परीक्षा 26 एप्रिलला होणार आहे. या वेबसाईटवर अर्ज करु शकता- https://www.tcs.com/careers/india/tcs-bps-fresher-hiring-2024
इतका असेल पगार
TCS तीन श्रेणींसाठी भरती करत आहे ज्यामध्ये निन्जा, डिजिटल आणि प्राइम नावाच्या श्रेणी आहेत. निन्जा श्रेणीमध्ये निवडलेल्या व्यक्तींना दरवर्षी 3.36 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. TCSच्या डिजिटल श्रेणीमध्ये वार्षिक 7 लाख रुपये आणि प्राइम श्रेणीमध्ये वार्षिक 9-11.5 लाख रुपये देऊ केले आहेत.
कंपनीच्या व्यवस्थापनाने जानेवारीमध्ये जाहीर केले होते की ते 2024-25 या आर्थिक वर्षासाठी फ्रेशर्सची भरती करण्याची प्रक्रिया सुरू करत आहेत. कंपनी आता भरतीसाठी संस्थांशी संपर्क साधत आहे.
TCS चे मुख्य एचआर अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितले होते, 'आम्ही पुढील वर्षासाठी आमची कॅम्पस हायरिंग सुरू केली आहे आणि फ्रेशर्स टीसीएसमध्ये सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.'
त्यावेळी लक्कड यांनी किती कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत याबाबत नेमकी माहिती दिली नाही, मात्र कंपनी मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचे सांगितले. TCS ने 2023-24 या आर्थिक वर्षात 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले होते.
टीसीएसची प्रतिस्पर्धी कंपनी इन्फोसिसने जानेवारीमध्ये सांगितले होते की, सध्या कॅम्पस भरतीसाठी त्यांची कोणतीही योजना नाही. मात्र, फेब्रुवारीमध्ये आलेल्या वृत्तानुसार कंपनीने काही पदांवर नियुक्त्या केल्या होत्या.
TCS कंपनीने जानेवारीमध्ये जाहीर केले होते की 1.5 लाख कर्मचाऱ्यांना विविध कौशल्य कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षित केले गेले आहे. कंपनीने आता GenAI मध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.
GenAI मध्ये 3,50,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना मूलभूत कौशल्यांवर प्रशिक्षित करून, TCS जगातील सर्वात मोठ्या AI-प्रशिक्षित कर्मचाऱ्यांपैकी एक कंपनी बनली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
एक टिप्पणी भेजें