PM किसान योजनेत या 3 लाख शेतकरी हफ्त्यापासून वंचित तुमचं तर नाव नाही ? वाचा डिटेल्स ! Pm Kisan Reject List

 




Pm Kisan Reject List : जिल्ह्यात खातेदार शेतकऱ्यांची संख्या मोठी असली तरी सहा लाख 66 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी कृषी खात्याकडे नोंदणी केली आहे.


त्यापैकी चार लाख 82 हजार शेतकऱ्यांचीच ई- केवायसी, लँड सीडिंग व इतर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चार लाख 82 हजार शेतकऱ्यांनी पैसे जमा होण्यासाठीची



प्रक्रिया पूर्ण केली असली तरी बँकांच्या त्रुटीमुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाखांहून अधिक शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित राहत असल्याचे समोर येत आहे.


Pm Kisan Reject List

दोन हजारांसाठी एवढे कशाला करायचे?, अशी भाषा सुरुवातीला शेतकऱ्यांची होती. मात्र, पुढे याच दोन हजार रुपयांसाठी शेतकरी बँक, कृषी कार्यालय,



 

तहसीलदार या यंत्रणेशी संबंधित व्यक्ती, महा-ई-सेवा व इतरांकडे चौकशी करीत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचाअवघे दीड लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे


सलग 14 हप्ते जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख 42 हजार 506 इतकी आहे. म्हणजे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 6 लाख 66 हजार इतकी असली तरी प्रधानमंत्री किसान सन्मान


योजनेचे पैसे जमा होणारे शेतकरी तीन लाखांवर आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रत्येक हप्ता जमा करताना या ना त्या कारणावरून शेतकरी संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.


 

एक-दोन हप्ते जमा झाले की, मध्येच एक-दोन हप्ते जमा होत नाहीत. पैसे जमा झाले नसल्याने पुन्हा तलाठी, सर्कल, बँक, तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. पुन्हा एक-दोन हप्त्यांचे पैसे जमा होतात व पुन्हा पैसे जमा होत नसल्याने तीच ती कारणे सांगितली जातात.

Post a Comment

और नया पुराने