Pm Kusum Yojana : अर्थात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर आणि एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप दिला जात आहे.
ही योजना ज्या शेतकऱ्यांना अद्याप विजेचे कनेक्शन नाही त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. किती अनुदान मिळत 3 एचपीच्या सौर कृषी पंपची किंमत 1,93,803 रुपये आहे.
यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी हिस्सा 19,380 रुपये एवढा आहे. एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 9,690 रुपये आहे. म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन
एचपीच्या पंपासाठी एक लाख 74 हजार 423 रुपये आणि एससी/एसटी शेतकऱ्यांना एक लाख 84 हजार 113 रुपय अनुदान मिळणार आहे.
Pm Kusum Yojana
5 एचपी पंपसाठी 2,69,746 रुपये किंमत ठरवण्यात आली असून यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% म्हणजे 26,975 रुपये भरावे लागणार आहेत.
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याना 5% म्हणजे 13,488 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे पाच एचपी च्या पंपासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना दोन लाख 42 हजार 771 आणि एससी/एसटी
शेतकऱ्यांना दोन लाख 56 हजार 258 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. 7.5 एचपी पंपची एकूण किंमत 3,74,402 रुपये ठेवण्यात आली असून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना
दहा टक्के म्हणजेच 37,440 रुपये रक्कम भरावी लागणार आहे आणि एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के म्हणजे 18,720 रुपये रक्कम भरावी लागणार आहे.
याचाच अर्थ साडेसात एचपीच्या पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन लाख 36 हजार 962 रुपये आणि एससी/एसटी शेतकऱ्यांना तीन लाख 55 हजार 682 इतकं अनुदान मिळणार आहे.
अर्ज कुठे करणार : या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाऊर्जेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. महाऊर्जेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर
उजवीकडे महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी हा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर शेतकऱ्यांना क्लिक करायचं आहे.
याच्यावर क्लिक केल्यानंतर या योजनेसाठीचा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करायची आहेत.
प्रविण श्रीधर धोटे 9834232295
जवाब देंहटाएंएक टिप्पणी भेजें