एक एप्रिल पासून घरगुती गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सूट ! पण…

 




LPG Gas Cylinder Price : मार्च महिन्याचे फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. उद्या मार्च एंडिंग राहणार आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 आता संपणार आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष अर्थातच आर्थिक वर्ष 2024-25 ला सुरवात होणार आहे. दरम्यान नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच देशभरातील महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.



निवडणुकीचे वर्ष पाहता केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.


या निर्णयानुसार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत असणारी सबसिडी आता 31 मार्च 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना 300 रुपये प्रति गॅस सिलेंडर एवढी सबसिडी दिली जात आहे.


ही सबसिडीची योजना मात्र 31 मार्च 2024 ला संपणार होती. परंतु निवडणुकांचे वर्ष पाहता आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने या सबसिडीच्या योजनेला एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी घेतलेला आहे.

 

यामुळे येत्या नवीन आर्थिक वर्षात ही सर्वसामान्यांसाठी मोठी भेट राहणार असे बोलले जात आहे. येत्या आर्थिक वर्षात देशभरातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता जशी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी मिळत आहे तशीच सबसिडी मिळत राहणार आहे.


म्हणजेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर सहाशे रुपयांना मिळू शकणार आहे. सबसिडीचे तीनशे रुपये हे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.


या योजनेअंतर्गत मात्र एका वर्षात फक्त 12 सिलेंडरवर लाभ मिळणार आहे. म्हणजेच एका वर्षात बारा सिलेंडर रिफील केल्यास तीनशे रुपये प्रति सिलेंडर एवढी सबसिडी मिळू शकणार आहे.


यापेक्षा जास्तीचे सिलेंडर जर भरले तर म्हणजे बारा सिलेंडरपेक्षा अधिकच्या सिलेंडरवर या सबसिडीचा लाभ मिळणार नाही याची नोंद सदर लाभार्थ्यांनी घ्यायची आहे.


या सदर लाभार्थी वर्गाला वर्षभरात 12 घरगुती गॅस सिलेंडरच्या रिफिलवर अनुदान प्रदान केले जात आहे. या अंतर्गत 14.2 किलो सिलेंडरमागे 300 रुपये सबसिडी दिली जाते. अनुदान थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.


अशाप्रकारे उज्ज्वला लाभार्थ्यांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ३०० रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहे. दरम्यान या योजनेवर सरकार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण 12,000 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

Post a Comment

और नया पुराने