Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये




 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांएवेजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या.


'साम'च्या वृत्तानुसार, माझ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये मी बोलतो ते काय विरोधक करतायेत, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिल आहे. महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असंही मुख्यंत्र्यांनी सांगितले. शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री मोदींनी 6000 ते 12000 ती सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर एम एस पी वर वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



Post a Comment

और नया पुराने