फक्त 10,000 जमा करा 7,13,658 मिळणार रिटर्न Post office RD investment scheme

 



बरेच बांधवांना या योजनेबद्दल अधिक माहिती नाही ही योजना पोस्टाद्वारे राबवली जाणारी योजना आहे. ही योजना Post office RD investment scheme म्हणून राबविण्यात येते.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला काही पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्याला चांगल्या पद्धतीने परतावा मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करणार आहे याची रक्कम तुम्हाला पाच वर्षानंतर व्याजासहित परत मिळेल.


या योजनेचा लाभ करण्यासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे ही गुंतवणूक लाभार्थ्याला दर महिन्याला म्हणजेच प्रति महिना या योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.


जर तुम्ही या योजनेचा लाभ प्रायव्हेट बँक मधून घेत असाल तर यामध्ये तुम्हाला सुरक्षेचे प्रमाण खूप कमी प्रमाणात दिसेल.


या योजनेचा लाभ कसा घ्यायचा प्रति महिना किती रुपयाची गुंतवणूक करायची आणि लाभ घेण्यासाठी काय करायचे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. Post office RD investment scheme.


Post office RD investment scheme किती मिळेल परतावा

दिनांक 1 एप्रिल 2024 पासून आरडी योजना इंटरेस्ट  रेट  वाढलेला आहे. सध्याचा इंटरेस्ट रेट हा 6.7 इतका आहे. यामध्ये जर तुम्ही शंभर रुपये किंवा यापेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर परतावा किती मिळेल बघा खालील प्रमाणे.


जर तुम्ही प्रति महिन्याला 100 रुपये गुंतवणूक करत असेल तर यामध्ये पाच वर्षानंतर तुमची गुंतवणूक ही 6000 इतकी होईल. यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट सुद्धा मिळणार आहे जो की एकूण 1137 रुपये इतका असणार आहे. याची एकूण रक्कम तुम्हाला 7137 इतकी मिळणार आहे.



म्हणजे जर तुम्ही प्रति वर्षाला फक्त 100 रुपयाची गुंतवणूक केली तर पुढील पाच वर्षानंतर तुम्हाला एकूण 7137 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.


जर तुम्ही यामध्ये प्रति महिना 500 रुपये गुंतवणूक करत असाल तर पाच वर्षानंतर तुमची एकूण रक्कम ही 30,000 इतकी होईल यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट हा 5682.9 रुपये इतका मिळेल. यामध्ये टोटल रक्कम 35,682.91 रुपये इतकी मिळेल.


जर तुम्ही यामध्ये प्रति महिना 2000 रुपये गुंतवणूक करत असाल तर यामध्ये तुम्हाला एकूण रक्कम ही 120,000 इतकी मिळेल यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट हा 22731.66 मिळेल. यामध्ये एकूण रक्कम 142,731.66 इतकी मिळेल


अशाच पद्धतीने जर तुम्ही या योजनेमध्ये एकूण 10 हजार रुपये प्रति महिना जर गुंतवणूक केली तर यामध्ये तुम्हाला एकूण रक्कम 713,658.29 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे ही टोटल रक्कम आहे यामध्ये तुमचे जे जमा होणारे पैसे आहेत ते  600000 इतकी आहे आणि यामध्ये तुम्हाला एकूण इंटरेस्ट 113,658.29 रुपये इतका मिळणार आहे


वरील रक्कम आर्थिक वर्ष 2024 वर आधारित आहे. Post office RD investment scheme.



या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट बँक मध्ये तुमचे आरडी खाते उघडणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Post a Comment

और नया पुराने