Ration Card तुम्हाला तुमच्या मुलांची नावे रेशन कार्ड वर जोडायचे आहेत का.? तर जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया.!!




  Ration Card नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे राशन कार्ड वर तुम्हाला तुमच्या मुलांची नावे जोडायचे आहे तर संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला जाणून घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मुलांची नावे राशन कार्ड मध्ये Add अर्थातच लावता येणार आहेत.

 

 


मित्रांनो रेशन कार्ड हे एकदम महत्वाचा कागद आहे आणि भारत शासनाकडून रेशन कार्ड गोरगरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणून सुद्धा राशन कार्ड खूप महत्त्वाचे ठरते. त्याच्यासोबत सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की गहू, तांदूळ, रॉकेल, साखर, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू यामध्ये आपल्याला मिळतात. या सर्व वस्तू फक्त रॉकेल हे बंद झालेले असून बाकी सर्व राशन कार्ड वर मिळतात. रेशन कार्ड हे एक चांगल्या प्रकारचा ओळखपत्र पुरावा आणि रहिवासी दाखला सुद्धा मानला जात आहे.

  


याचा उपयोग आपण बँकेमध्ये बँक अकाउंट सुरू करण्यापासून ते पासपोर्ट घेण्यापर्यंत तसेच इतर सरकारी सेवन चा लाभ घेण्यापर्यंत सुद्धा करू शकतो. याद्वारे आपण सबसिडी असलेले खाद्यपदार्थ खरेदी करू शकतो. गरीब आणि आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या नागरिकांना अन्न मिळावे यासाठी रेशन कार्ड सुविधा शासनाने सुरू केली आहे. 





इतर सरकारी योजना चालू आहे काही सरकारी योजना जसे की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही फक्त रेशन कार्डधारक जे आहेत त्यांच्यासाठीच उपलब्ध आहे. राशन कार्ड साठी तुम्हाला अप्लाय करायचा असल्यास काही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आज आपण ऑनलाइन पद्धतीने नाव राशन कार्ड मध्ये कसे जोडायचा आहे हे जाणून घेणार आहोत.

 



अशाप्रकारे राशन कार्ड मध्ये नाव जोडा.

1) मित्रांनो सर्वात सुरुवातीला तुम्हाला अन्नसुरक्षा विभागाच्या या 👉 https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx संकेतस्थळावर जायचं आहे.
2) त्यानंतर रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील जास्त सदस्याचे नाव जोडायचे आहे त्या ऑप्शनवर सदस्याचे नाव जोडा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
3) त्यानंतर आलेला फॉर्म जो आहे तो ऑनलाइन पद्धतीने व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे.
4) या फॉर्ममध्ये गरजेची माहिती जसं की आपलं नाव, राशन कार्ड नंबर, मुलांची नावे, जन्म तारीख, आधार कार्ड ही माहिती भरा.
5) आपल्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6) अर्ज सबमिट केल्यानंतर एक नोंदणी क्रमांक आपल्याला मिळणार आहे. आणि याच नोंदणी क्रमांक द्वारे आपण आपले रेशन कार्ड वर मुलांची नावे जोडली गेली की नाही.? हे चेक करू शकतो.



Post a Comment

और नया पुराने