Bandhkam Kamgar Yojana नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांना बऱ्याचशा योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुमची नोंदणी आवश्यक आहे आणि ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही फक्त एक रुपयांमध्ये या सर्व बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकता.
आता तुम्ही म्हणत असाल की एजंट द्वारे खूपच जास्त पैसे लागतात पण मित्रांनो यासाठी एजंट द्वारे नोंदणी करण्याची काहीच आवश्यकता नाही आपण आपल्या मोबाईल वरती सुद्धा फक्त एक रुपया मध्ये बांधकाम कामगार नोंदणी करू शकणार आहात. ते कशा पद्धतीने करायचे आहे.? ते आता आपण जाणून घेणार आहोत.
ऑनलाइन नोंदणी लिंक 👉 https://mahabocw.in/mr/
बांधकाम कामगार नोंदणी लाभार्थी मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने करू शकतात यासाठी मात्र एक रुपया इतका खर्च तुम्हाला येणार आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत लाभार्थी झाला तर तुम्हाला जवळपास 32 योजनांचा लाभ मिळणार आहे जे की संपूर्णतः शासकीय योजना आहेत.
या योजनांमध्ये तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिप मिळणार आहे तसेच घर उपयोगी सामान इत्यादी बऱ्याचशा योजना अशा 32 सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. बांधकाम कामगार नोंदणी ही प्रक्रिया सुलभ आणि सोपी असून तुम्हाला सुद्धा बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन करायचे आहे तरीही माहिती शेवटपर्यंत पहा.
अशी करा बांधकाम कामगार नोंदणी.
या योजनेची ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज निर्माण होणार आहे.
आता या ठिकाणी आपल्याला आपले जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान सिलेक्ट करायचे आहे.
यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या निळ्या बटन वर टच करायचा आहे.
आता परत तुमच्यासमोर एक अर्ज दिसणार आहे यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरायची आहे.
माहितीमध्ये जसं की आपलं संपूर्ण नाव पुरुष किंवा स्त्री अर्जदाराचा आधार क्रमांक, पत्ता ही माहिती भरायची आहे.
तुमची जन्मतारीख आणि इतर माहिती सुद्धा या ठिकाणी भरायचे आहे. तसेच तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे.
कौटुंबिक माहिती सुद्धा आवश्यक.
1) अर्जदाराच्या घरामध्ये एकूण व्यक्ती किती आहेत त्यांची नावे टाका.
2) आधार नंबर आणि कुठला व्यवसाय तुम्ही करत आहात हे सुद्धा माहिती टाका.
3) तुमचे बँकेचे आयएफसी कोड आणि बँकेची शाखेची माहिती टाका.
4) तुम्हाला 90 दिवस काम केले आहे याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करायचे. हे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधून घ्यावे लागेल.
वरील सर्व माहिती तुम्हाला अर्ज करताना भरावी लागणार आहे.
ही लागतील आवश्यक कागदपत्रे.
1) तुमचे रहिवासी प्रमाणपत्र
2) पासबुक झेरॉक्स
3) 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
4) तुमचा पासपोर्ट फोटो
5) स्वामघोषणापत्र
6) वयाचा पुरावा
अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी मोबाईलवर करू शकता. ऑनलाइन नोंदणी लिंक खाली दिलेली आहे.
एक टिप्पणी भेजें