खुशखबर ..! “या” विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत 6 महिन्याचा मोफत कम्प्युटर कोर्स; |Sarthi free Computer Course 2024

 



Sarthi free Computer Course 2024 नमस्कार मित्रांनो सारथी अंतर्गत मराठा समाजातील आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आलेली आहे – मोफत कम्प्युटर कोर्स करण्याची! हा मोफत कम्प्युटर कोर्स सारथी या संस्थेमार्फत केला जाणार आहे. यामध्ये चाळीस हजार जागांची भरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच फॉर्म भरावा लागेल. कारण, हा कम्प्युटर कोर्स अगदी मोफत आहे.

उदाहरणार्थ, तुम्ही कम्प्युटर ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, वेब डिझायनर सारखे अनेक कौशल्ये शिकू शकता.


याच्यासाठी कोण पात्र आहे, तसेच याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा, तसेच हा कम्प्युटर कोर्स कुठे होणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत.



sarathi mofat computer course


मोफत कॉम्प्युटर कोर्सला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

सारथी पुणे एमकेसीएल पुणे यांच्या मार्फत छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे . या कार्यक्रमांतर्गत मराठा कुणबी आणि कुणबी मराठा तसेच नॉन क्रिमिलियर गटाच्या युवकांसाठी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कॉम्प्युटर कोर्स मोफत देण्यात येत आहे.  त्यासाठी पात्रता ही खालील प्रमाणे आहे.


सारथी मोफत कम्प्युटर कोर्स साठी पात्रता: Sarthi free Computer Course 2024 eligibility criteria


अर्ज करणारा व्यक्ती कमीत कमी दहावी पास असावा

अर्ज करणारी व्यक्ती ही मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा नॉन क्रिमीलेअर धारक असावी.

अर्जदाराचे वय हे 18 ते 45 वयोगटातील असावा.

सारथी मोफत कॉम्प्युटर कोर्स कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हे निशुल्क असून यासाठी कोणत्याही प्रकारची फीस आकारली जात नाही. तसेच सदर प्रशिक्षणाचा खर्च हा सारथी पुणे मार्फत करण्यात येतो. आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा एमकेसीएलच्या अध्ययन केंद्रामार्फत घेतला जातो सदर विल कोर्स हा संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षण हे अनिवासी असून प्रशिक्षणांना दरम्यान जो काही राहण्याचा आणि जेवणाचा खर्च होणार आहे तो विद्यार्थ्यांना स्वतः करावा लागणार आहे. सारथी यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहाय्यता करणार नाही.


सदरील कोर्सचा कालावधी हा सहा महिन्याचा आहे त्यामुळे जर कोणी बाहेरगावी जाऊन शिकणार असेल. तर त्यांनी स्वतःच राहण्या खाण्याची व्यवस्था करावी लागेल आणि अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. तर अर्ध स्वीकारण्याची तारीख ही एक एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी एमकेसीएलच्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचे आहेत. अर्ज करण्यासाठी वर आणि खाली दोन्ही ठिकाणी आम्ही लिंक दिलेली आहे.


सारथी मोफत कम्प्युटर कोर्स- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: sarathi computer course documents required


विहित नमुन्यातील अर्ज

फोटो

शैक्षणिक गुणपत्रक

जाती प्रमाणपत्र/ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र

टीसी

एक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (३१ मार्च २०२४ पर्यंत वैद्य)

जन्माचा दाखला

नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र

तीन वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र

तहसीलदार यांच्याकडून राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट)

आधार कार्ड

उमेदवाराचा फोटो आणि सही

सदरील प्रशिक्षण हे एमकेसीएलच्या अध्ययन केंद्रावर ती म्हणजेच एलसी वरती होणार आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा जवळच्या एलसी मध्ये जाऊन जरी इन्क्वायरी केली तरी सुद्धा ते तुम्हाला नक्की मदत करतील.


Post a Comment

और नया पुराने