Ration Card News : तुमच्याकडेही रेशन कार्ड आहे का मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरंतर आपल्या महाराष्ट्रात रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रंगाचे रेशन कार्ड असतात.
काही लोकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे, काही लोकांकडे केशरी रेशन कार्ड आहे तर काही लोकांकडे पांढरे रेशन कार्ड आहे. दरम्यान रंगानुसार रेशन कार्डवर दिल्या जाणाऱ्यां धान्यात देखील बदल पाहायला मिळतो. सध्या स्थितीला रेशन कार्डचे शासनाने चार प्रकार तयार केले आहेत.
अंत्योदय म्हणजेच पिवळे, प्राधान्य कुटुंब अर्थातच केशरी, अबव्ह पॉव्हर्टी लाईन कुटुंबासाठी म्हणजेच दारिद्र्यरेषेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना एपीएल आणि पांढरे असे चार प्रकार पडतात. तुमच्याकडे असलेल्या रेशन कार्ड वरून तुम्हाला धान्य मिळणार की नाही हे ठरत असते
अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या रेशन कार्ड धारकाला किती धान्य मिळते आणि कोणते असे रेशन कार्डधारक आहेत ज्यांना धान्य मिळत नाही याविषयी सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रेशन कार्ड धारकाला धान्य मिळत नाही
पांढरे शुभ्र आणि एपीएल (केशरी) रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही. आर्थिक दृष्ट्या सक्षम लोकांना पांढरे कार्ड दिले जाते. या लोकांना अनुदानाच्या धान्याची गरज नसते यामुळे त्यांना धान्य मिळत नाही.
दुसरीकडे एपीएल हे अशा लोकांना जारी होते ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात 44 हजारापेक्षा जास्त व शहरी भागात 59 हजार पेक्षा जास्त व एक लाख रुपयांपेक्षा कमी असते.
असे रेशन कार्ड ज्यांच्याकडे असते ते दारिद्र्यरेषेपेक्षा वर असतात म्हणजे Above Poverty Line असतात यामुळे त्यांना देखील धान्य मिळत नाही.
कोणाला किती धान्य ?
पिवळे रेशन कार्डधारक म्हणजेच अंत्योदय कार्ड अशा लोकांना जारी केले जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. याशिवाय घरात दिव्यांग आणि विधवा व्यक्ती असेल तरीसुद्धा हे रेशन कार्ड जारी होते.
या रेशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य मिळते. यामध्ये 15 किलो गहू आणि 20 किलो तांदळाचा समावेश राहतो. तसेच वीस रुपये प्रति किलो या दराने एक किलो साखर देखील मिळते.
याशिवाय ज्या लोकांचे ग्रामीण भागात 44 हजार रुपयांपेक्षा कमी आणि शहरी भागात 59 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असते अशा लोकांना केशरी रेशन कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना प्रती व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतो.
एक टिप्पणी भेजें