पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यताआहे.
यामध्ये शनिवारी (दि.१०) आणि रविवारी (दि.११) रोजी विदर्भ आणि मराठावाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिले आहे. (Rain In Maharashtra)
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X
अकाऊंटवरून दिली आहे. उद्या शनिवारी कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत
वादळी वारे 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचेदेखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातीलजालना, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी केलेल्या
द्विटमध्ये म्हटले आहे. (Rain In Maharashtra)
एक टिप्पणी भेजें