PAN Aadhaar linking: केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 11 कोटीहून अधिक पॅनकार्डधारक आहेत ज्यांनी पॅनला आधारशी लिंक केलेले नाही. ही आकडेवारी अर्थ मंत्रालयाने संसदेत मांडली आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले की, 29 जानेवारी 2024 पर्यंत देशभरात 11.48 कोटी पॅनकार्डधारक आहेत ज्यांनी त्यांचे पॅन आधारशी लिंक केले नाही.
30 जून 2023च्या अंतिम मुदतीनंतर PAN आणि आधार लिंक न करणाऱ्या व्यक्तींवर 1,000 रुपयांच्या दंड आकारला जात आहे. दंडाच्या कमाईबाबत संसदेत एक प्रश्न विचारण्यात आला होता.
याला उत्तर देताना, अर्थ राज्यमंत्री म्हणाले की 1 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत ज्यांनी PAN आधारशी लिंक केले नाही त्यांच्याकडून एकूण 601.97 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.
पॅन-आधार लिंक कसे करावे -
1. पॅन आधार लिंक करण्यासाठी, आयकर ई-फायलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/help/how-to-link-aadhaar ला भेट द्या.
2. वेबसाइटवर तुमची नोंदणी नसेल तर तुमची नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर, तुमचा पॅन क्रमांक तुमचा युजर आयडी असेल.
3. नंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि तारीख टाकून लॉग इन करा.
4. यानंतर तुमच्या समोर एक पॉप अप विंडो येईल ज्यामध्ये पॅन आधारशी लिंक केले जाईल. तुम्ही प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन आधार लिंकवर क्लिक करू शकता.
5. पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि लिंगाचा तपशील टाकावा लागेल.
6. माहिती भरल्यानंतर लिंकवर क्लिक करा.
7. तुम्ही 1,000 रुपये दंड भरून पॅन आणि आधार लिंक करू शकता.
8. पॅन आधार लिंक होताच तुमच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर एक मेसेज येईल.
एक टिप्पणी भेजें