Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या तपशील

 




SSC Result 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. 




२ जून रोजी हा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान हा निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.


दहावीच्या मार्च - एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.


कुठे पाहाल निकाल?


पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -


www.mahresult.nic.in


http://sscresult.mkcl.org


https://ssc.mahresults.org.in


www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


SSC Result 2023 : असा पाहा निकाल

स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.

स्टेप ४) दहावीचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Post a Comment

और नया पुराने