असा निकाल चेक करा
अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in वर जा
SSC Result 2023साठी लिंकवर क्लिक करा
सीट नंबर टाका, आईचे नाव टाका
निकालाची प्रत तुमच्या ऑनलाईन स्क्रिनवर दिसेल
गुण पडताळणी अर्ज कुठे कराल?
http://verification.mh-ssc.ac.in
तुमच्या विभागाचा निकाल किती टक्के?
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
पोरीच नंबर वन
राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदा दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे.
सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले
यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च रोजी सुरू झाली. 25 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू होती. या परीक्षेसाठी 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 8 लाख 44 हजाराहून अधिक विद्यार्थी आणि 7 लाख 33 हजाराहून अधिक विद्यार्थींनीनी यावेळी परीक्षा दिली होती.
साडे सहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के
एकूण 23013 शाळांपैकी 6844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामिगीरी सरस ठरली आहे. मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला.
एक टिप्पणी भेजें